Mumbai : महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती – शरद पवार

एमपीसी न्यूज – सरकार स्थापनेसंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे यावर तीनही पक्षांनी सहमती दर्शविली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 

सरकार स्थापनेसंदर्भात सध्या वेगवान हालचाली होत आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला होता. सरकार स्थापनेच्या दृष्टीने आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांनीच सहमती दर्शवली. नेतृत्वाबाबत कोणत्याही पक्षात दूमत नाही, असे बैठकीतून बाहेर पडल्यावर शरद पवार यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर उद्धव ठाकरे या बैठकीतून बाहेर आले असता त्यांनी मुंख्यमंत्री पद स्वीकारणार का यावर अद्याप कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. तर संपूर्ण 5 वर्षे मुख्यमंत्रीपद भेटत असेल तर उद्धव ठाकरे हे पद स्वीकारतील अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. किंवा उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्यावर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे असेही शरद पवार यांनी या बैठकीत सुचवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like