Uddhav Thackeray : लोकशाही संपून बेबंदशाहीला सुरुवात – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज : शिवसेना आणि धनुष्यबाण हातून (Uddhav Thackeray) गेल्यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत लोकशाही संपली असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावे असे म्हंटले आहे. तसेच आता या निर्णायाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात लढा देणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Chinchwad Bye-Election :  नाना काटे यांना 40 संघटनांचा पाठिंबा !

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक असल्याचे म्हंटले आहे. तसेच  स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपले असल्याचे मोदींनी जाहीर करावे असे म्हंटले असून लोकशाहीला आदरांजली वाहून बेबंदशाहीला सुरुवात (Uddhav Thackeray) केल्याचे मोदींनी जाहीर करावे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.