BNR-HDR-TOP-Mobile

Pune : मुंबई प्रमाणेच पुण्यातील प्रकल्पांचाही उद्धव ठाकरे घेणार आढावा

एमपीसी न्यूज – मुंबईतील विविध प्रकल्पांचा आढावा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेणे सुरू केला आहे. त्याचप्रमाणे पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रकल्पांचाही आढावा उद्धव ठाकरे घेणार असल्याची पुणे महापालिकेत चर्चा सुरू आहे. त्याला नुकतीच किनार आहे, ‘एचसीएमटीआर’ची.

हा प्रकल्प 30 वर्षांपूर्वीचा आहे. हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी व पुणेकरांचे हित जोपासण्यासाठी पुणे शहराच्या सद्य परिस्थितीचा विचार करूनच नवीन पुनर्रचना या प्रकल्पाची करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रकल्प रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी ठणकावून सांगितले. 8 हजार कोटी रुपये खर्च या प्रकल्पासाठी येणार आहे. एवढा खर्च महापालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे सध्या या प्रकल्पाला स्थगिती दिल्याचे महापालिका आयुक्त सौरभ म्हणाले.

महापालिकेत 23 गावांचा समावेश, शिवसुष्टी, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, ‘पीएमआरडीए’, रिंगरोड, मेट्रो, 24 बाय समान पाणीपुरवठा योजना, बसेस खरेदी, 11 गावांचा विकास आराखडा, 2 वेळ शुद्ध पाणीपुरवठा, ‘हायपरलूप’, अशा अनेक प्रकल्पांचा राज्य शासन आढावा घेणार असल्याचे समजते.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3