Uddhav Thackeray : ‘आता जिंकेपर्यंत लढायचं..’ मालेगावच्या सभेतून उद्धव ठाकरे यांचा नवीन नारा

एमपीसी न्यूज : ‘आता जिंकेपर्यंत लढायचं..‘ असा नवीन नारा उद्धव ठाकरे यांनी मालेगावतील सभेतून दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमधल्या मालेगाव येथे मोठी सभा घेतली. (Uddhav Thackeray) यासाठी ठाकरे गटाच्या नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. पक्षाची मोट पुन्हा बांधण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार आहेत. त्यापैकी पहिली सभा कोकणातील खेड येथे झाली. तर दुसरी सभा आज मालेगावात झाली. यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे.
आजच्या या सभेचं काय वर्णन करायचं 15 दिवसांपूर्वी एक खेडला सभा होती, अभुतपूर्व गर्दी होती. आज अथांग गर्दी पसरली आहे. आज आपलं नाव चोरलं धनुष्यबाण चोरलं, नाव चोरलं तरी सुद्धा एवढी गर्दी आहे. ही पूर्वजांची पुण्याई आणि आई तुळजाभवानीचा आशिर्वाद आहे. मी स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. तर तुमच्या प्रश्नासाठी लढत आहे. आता जिंकेपर्यंत लढायचं आहे. सुरुवातीलच विचारतो, जिंकेपर्यंत राहणार आहात ना?
मी त्यावेळी घरात बसून सांगितलं होतं, तरी लोकांनी ऐकलं, मालेगावकरांनी ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद. मुख्यमंत्रिपद येतं आणि जात. लोकांनी भरभरून प्रेम दिलं हे गद्दारांना लाभणार नाही. (Uddhav Thackeray) ही गर्दी भाड्याने आणता येत नाही,
सुहास कांदेंना टोला, कांदा किती खोक्याला विकला गेला
तुमच्याकडे किती कांदा शेतकरी आहे, कांद्याला भाव मिळाला का? कांदा खरेदी झाली नाही. एका कांद्याची खरेदी झाली. एका खोक्याला एक कांदा गेला. मग तुमच्या कांद्याला किती भाव मिळाला पाहिजे होता. तुमच्या मेहनतीचा पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे.
उद्धव ठाकरे पुेढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पुत्र असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. (Uddhav Thackeray) हे काय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे. ज्यांच्या गळ्यात घंटा बांधली, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं नाव न घेता उपस्थित केला.