Mumbai : उद्धव ठाकरे होणार राज्याचे मुख्यमंत्री, महाविकासआघाडीच्या बैठकीत घोषणा

एमपीसी न्यूज –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत आज (मंगळवारी) याबाबतची घोषणा करण्यात आली. याबाबतच्या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. महाआघाडीचे नेतृत्व ठाकरे करणार आहेत. त्यामुळे आता राज्यात ठाकरे सरकार असणार आहे.

महाआघाडीची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाआघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार असल्याचे जाहीर केले. या ठरावाला सर्वांनी एकमताने मान्यता दिली. त्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला.

उद्धव ठाकरे हे या आघाडीचे नेतृत्वही करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील एकमेव व्यक्ती ठरणार आहेत. येत्या एक डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे शिवतिर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.