Pune : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याने सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री पुणे शहरातून सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

शिवसेना सोबत होती तर महाराष्ट्राचे सर्वात जास्त कार्यकाळ टिकणारे मुख्यमंत्री होते फडणवीस! आणि आज शिवसेना सोबत नाही म्हणून सर्वात कमी काळ टिकणारे मुख्यमंत्री पण फडणवीसच! मित्राला सोबत घेऊन चालायला शिका, त्याला संपवायला निघाले तर तुम्ही स्वतःच संपणारच! अशा आशयाचेही मॅसेज फिरत आहेत. स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.