Pimpri : महायुतीच्या प्रचाराचा नारळ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी पिंपरीत फुटणार

एमपीसी न्यूज – महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा येत्या शुक्रवारी (ता. ११) पिंपरी येथे होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी येथील आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात सायंकाळी सहा वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार, चिंचवड व भोसरी मतदारसंघाचे भाजप उमेदवार अनुक्रमे लक्ष्मण जगताप व महेश लांडगे या महायुतीच्या तीनही उमेदवारांच्या संयुक्त प्रचाराचा नारळ ठाकरे यावेळी फोडणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी आज दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.