UGC Exam : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत पुढील सुनावणी 10 ऑगस्टला

The next hearing on the final year exams is on August 10 : केंद्रीय गृहमंत्रालयाचं याबाबतचं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने वेळ वाढवून दिला आहे.

एमपीसी न्यूज – विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 10 ऑगस्टला होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचं याबाबतचं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने वेळ वाढवून दिला आहे. तोपर्यंत यूजीसीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही फेटाळत अंतरिम आदेश देणार नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाविरुध्द सर्वोच्य न्यायालयात 31 विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्या आहेत. विद्यार्थ्याच्या बहुतांश याचिकांमध्ये परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मात्र, कोरोनाचे संकट गंभीर बनले असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

अंतिम आरशाच्या परीक्षांसंदर्भात युवा सेनेने देखील सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. संबंधित राज्यांमधील परिस्थितीनुसार परीक्षा घेण्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विद्यापीठांना देण्यात यावा, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.