Ujani Dam News : उजनी धरणातून एक लाख ऐंशी हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

एमपीसी न्यूज – काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आज (बुधवार) संध्याकाळपासून उजनी धरणातून एक लाख क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. वीर धरणातून 20 हजार तर पावसामुळे 30 ते 40 क्यूसेक विसर्गाने पाणी भीमा नदीच्या पात्रात मिसळत असून एकूण विसर्ग वाढून रात्री ८:३० वाजता १ लाख ८० हजार क्यूसेक करण्यात आला आहे.

भीमा नदीच्या काठी असलेली सोलापूर जिल्ह्यातील गावे व शहरांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढून आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.