Pimpri : उल्हास जगताप यांच्याकडे नागरवस्ती विभागाची जबाबदारी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे नागरवस्ती विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा निर्णय घेतला आहे.  

महापालिकेच्या नागर वस्ती विभागांतर्गत महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध समाज कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या विभागाची संपूर्ण माहिती असलेले नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  जगताप यांनी यापूर्वी या विभागात सहाय्यक समाज विकास अधिकारी म्हणून 5 वर्षे तर समाज विकास अधिकारी म्हणून 10 वर्षे काम केले आहे.

तब्बल 15 वर्षांच्या सेवेमुळे या विभागाची खडान्‌खडा माहिती त्यांना आहे. त्यांनी अनेक कल्याणकारी योजना त्यांच्या कार्यकाळात सुरू केल्या होत्या. नागरिक व लोकप्रतिनिधींना संयमाने हाताळण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्याकडे पुन्हा या विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.