Pune : सिमन्स संघासमोर अल्टिअस डाटा संघाची शरणागती 

अमित जगताप आणि मित्र परिवार आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी टी-२० क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज – मनोजकुमार भागवत आणि हिमांशू अगरवालच्या अचूक मा-याच्या जोरावर सिमन्स संघाने अमित जगताप आणि मित्र परिवाराच्या वतीने आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी टी-२० क्रिकेट स्पर्धेत अल्टिअस डाटा संघावर दहा गडी राखून सहज मात केली.

नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली. अल्टिअस डाटा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, त्या संघाचा डाव ७.३ षटकांत २७ धावांतच आटोपला. अल्टिअस डाटा संघाचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या चार धावांवर माघारी परतले होते. यानंतर ३ बाद २२ वरून अल्टिअस डाटा संघाचा डाव २७ धावांत आटोपला.

अल्टिअस डाटा संघाच्या सहा फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यात मनोजकुमार भागवतने पाच, तर हिमांशू अगरवालने ४ गडी बाद केले. यानंतर सिमन्स संघाच्या दीपककुमार-तुषार अत्तरदे या सलामी जोडीने विजयी लक्ष्य ४.१ षटकांतच पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक – अल्टिअस डाटा – ७.३ षटकांत सर्व बाद २७ (रिझवान शेख १४, मनोजकुमार भागवत ४-१-९-५, हिमांशू अगरवाल ३.३-०-१४-४) पराभूत वि. सिमन्स – ४.१ षटकांत बिनबाद २८ (तुषार अत्तरदे नाबाद १८, दीपककुमार नाबाद ७).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like