Manjari : विशेष मुलांच्या साथीने ब्लॅक बेल्ट कराटेपटू उमा बबन काळे यांचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज- ब्लॅक बेल्ट कराटेपटू उमा बबन काळे यांनी आपला वाढदिवस मतिमंद निवासी विद्यालय येथे साजरा केला. यावेळी विशेष मुलांच्या स्पर्धा घेऊन त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये 50 विशेष मुले सहभागी झाली.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून घनश्याम दरोडे पाटील उर्फ छोटा पुढारी व पैलवान विवेक बाप्पू घुले पाटील तसेच मराठा युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी शरद रणेर, गणेश पाटील, अविनाश उंद्रे, अमोल घुले, राजेश कुंजीर, निशा गुप्ता, पुनम उंबर्जे, अमृता गवारी, युवराज बर्गे, नवनाथ हंडे, प्रमोद खेडेकर, सुदर्शन शेवाळे, गीतांजली शेलार, गणेश दारवटकर, सुजाता झेंडे, नीता खेडेकर, विनोद पवार, बबलू घुले, विशाल वर्पे, हनुमंत ढमढेरे उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैजयंती कळसकर व संजय आव्हाळे यांनी मार्गदर्शन केले. विशेष मुलांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.