Pune : छत्री रंगकाम कार्यशाळेत रंगले पुणेकर !

भारतीय विद्या भवन ,इन्फोसिस फाउंडेशन च्या उपक्रमाला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत छत्री रंगकाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

शुभा रुद्र (जी.डी.आर्ट, ए.एम.), अस्मिता वेदपाठक, शिल्पा मोहिते (परांजपे विद्यामंदीर कोथरूड च्या चित्रकला शिक्षिका), वामन लेले ( चित्रकला शिक्षक,सुलोचना नातू विद्या मंदीर, शिवाजीनगर ) यांनी संयोजन केले. कार्यशाळा सर्वांसाठी खुली होती .

रविवारी सायंकाळी भारतीय विद्या भवन, परांजपे विद्या संकुल (कोथरूड )येथे ही कार्यशाळा झाली. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. आपल्या आवडीच्या पॅटर्नमध्ये छत्री रंगविण्यात आबालवृद्ध पुणेकर दंग होऊन गेले.

विविध वयोगटातील ५० जणांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. ‘ पंढरीचा राजा ‘, फुलपाखरे, मासोळ्या, माऊली, वारली चित्रकला अशा अनेक संकल्पना या कलाकारांनी छत्र्यांवर साकार केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.