Umed Abhiyan : कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त महिला शेतकऱ्यांसाठी शनिवारी ऑनलाईन प्रशिक्षण

Online training on Saturday for women farmers on the occasion of Krishi Sanjeevani Week ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुमारे साडेचौदा लाख  महिला शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, पूरक व्यवसायाच्या माहितीबरोबच डिजिटल तंत्रज्ञानाशी जुडण्याची संधी मिळणार आहे.

एमपीसी न्यूज – कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कृषी विभाग आणि उमेद अभियानामार्फत राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला शेतकऱ्यांकरिता उद्या (शनिवारी) ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 

या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुमारे साडेचौदा लाख  महिला शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, पूरक व्यवसायाच्या माहितीबरोबच डिजिटल तंत्रज्ञानाशी जुडण्याची संधी मिळणार आहे. खरीप हंगामातील सेंद्रीय शेती, एकत्रित शेती अशा विविध विषयांच्या अनुषंगाने प्रशिक्षणामध्ये चर्चा होणार आहे. उद्या शनिवारी 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून हे प्रशिक्षण सुरूवात होणार आहे.

प्रशिक्षणात parthlive.com  या संकेतस्थळावरुन तसेच उमेद अभियानाच्या mission umed या युट्यूब चॅनेलवरुन सहभागी होता येणार आहे.

या प्रशिक्षणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे मार्गदर्शन करणार आहेत.

महिला शेतकऱ्यांचे काम मर्यादित न राहता त्यांना शेतीतील अत्याधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान, शेळीपालन, कुकुटपालन आदी शेतीपूरक व्यवसाय, सेंद्रीय शेतीचे महत्व, एकत्रित शेती अशा विविध विषयांची माहिती व्हावी यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. शिवाय हे प्रशिक्षण ऑनलाईन असल्याने डिजिटल तंत्राचा वापर कसा करावा याची प्राथमिक माहितीही यानिमित्ताने महिला शेतकऱ्यांना होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.