Pimpri: प्राधिकरणाच्या भूखंडाचे बेकायदेशीपणे प्लॉटिग

प्लॉट विक्री करुन नागरिकांची फसवणूक करण्याचा होता डाव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या भूखंडाचे एका-एका गुठ्यांचे प्लॉट करण्यात आले होते. जागेवर मार्किंग करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. प्लॉट विक्री विक्री करुन नागरिकांची फसवणूक करण्याचा हा डाव होता. मात्र, प्राधिकरणाच्या अधिका-यांनी हा डाव हणून पाडला आहे. दरम्यान, प्लॉटिंग करणा-यांवर कायदेशीर तक्रार करणार असल्याचे प्राधिकरणाच्या अधिका-यांनी सांगितले.

नियोजनबध्द व सर्वांगीण विकास करणे व विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक,वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 14 मार्च 1972 मध्ये स्थापना झालेली आहे. प्राधिकरणाचे शहराच्या विविध भूखंड आहेत. चिखली, जाधववाडी येथील सेक्टर क्रमांक 13 व 14 येथे प्राधिकरणाचा भूखंड आहे. या भूखंडावर काही नागरिकांनी मार्किंग करुन त्याचे प्लॉटिंग केले होते. एका-एका गुठ्यांचे हे प्लॉट होते. जागा मार्किंग करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

हे प्लॉट नागरिकांना विकण्याचा डाव होता. परंतु, काही सजग नागरिकांनी याबाबतची कल्पना प्राधिकरणाच्या अधिका-यांना दिली. प्राधिकरणाच्या अधिका-यांनी आज (सोमवारी) घटनास्थळी धाव घेतली. प्लॉटिंग केलेले काढून टाकले. पोलीस बंदोबस्तात मार्किंग करणा-यांना हुसकावून लावले. तसेच मोकळ्या भूखंडावर थाटलेल्या झोपटपट्ट्या देखील हटविल्या आहेत. सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसवणुकीचा हा डाव फसला आहे.

याबाबत बोलताना प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके म्हणाले, ”चिखली, जाधववाडी येथील सेक्टर क्रमांक 13 व 14 येथे प्राधिकरणाचा मोकळा भूखंड आहे. पूर्वी ती गायरानाची जागा होती. त्याचा ताबा सध्या पिंपरी महापालिकेकडे असून प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या भूखंडावर मार्किंग करुन एका-एका गुठ्यांचे प्लॉट करण्यात आले होते. त्याच्या बाजूला दगड रचण्यात आले होते. हा प्रकार आम्हाला समजल्यानंतर अधिका-यांनी जाऊन ते दगड काढून टाकले आहेत. तसेच भूखंडावरील झोपड्या देखील हटविल्या आहेत. प्लॉटिंग करणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे”

"PCNTDA"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.