Pune : अनधिकृतपणे व्यवसाय, पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ते, फुटपाथवर रात्री 10 नंतर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे, असा इशारा महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. प्रमाणपत्रामधील अटी – शर्तींचा भंग करून व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच, खाजगी प्रवासी बसेस, अवजड वाहने, माल वाहतूक ट्रक, तीनचाकी व चारचाकी वाहने आदी अधिकृत बस थांब्याव्यतिरिक्त अनधिकृतपणे पार्किंग व व्यवसाय करीत असताना आढळून आल्यास त्यांच्यावर रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मध्यवर्ती पथक नेमण्यात आलेले आहे. या पथकामार्फत मोठ्या स्वरूपात दैनंदिन कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा अतिक्रमण विभागाचे उपयुक्त माधव जगताप यांनी दिला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा धडाकाच लावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.