Moshi News : अनधिकृत बांधकामे भुईसपाट

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरु केली आहे. मोशीतील डीपी रस्त्याने बाधित चार अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत.  

_MPC_DIR_MPU_II

मागील 15 दिवसांपासून महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. मंगळवारी ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय एकूण 4 अनधिकृत बांधकाम असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे  566 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आली आहेत. एक पोकलेन , एक जेसीबी , 10 मजूर व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त अजित पवार , सह शहर अभियंता  मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या नियंत्रणात  उपअभियंता हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता, बीट ऑफीसर  यांच्या पथकाने कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.