Pimpri News : अनधिकृत बांधकामावर पालिकेचा पडणार होतोडा 

एमपीसी न्यूजपिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दित अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून या बांधकामावर लवकरच पालिकेचा हातोडा पडणार आहे. त्याचाच भाग म्हणून मालमत्ता धारकांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची मोहिम पालिकेने सुरू केली आहे. मागील तीन दिवसांत पालिकेने 20 गुन्हे नोंद केले आहेत. बांधकाम पाडण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्षात हि मोहिम राबविण्यास सुरूवात होणार आहे

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या हद्दित चटईक्षेत्राचे उल्लंघन, आरक्षित जागांवर बांधकामे, सामासिक अंतर न सोडता झालेल्या मोठ मोठ्या इमारती आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत. रहिवासी व महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधकामे सुरू आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून नोटीस बजावून निर्धारित मुदतीत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे आदेश दिले. पालिकेचे आदेश धुडकावून लावल्याने त्यांच्याविरोधात आता गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अवैध बांधकामावर आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कामासाठी 1 कोटी 88 लाख रूपये एवढा दर निश्चित करण्यात आला असून ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च नायालयाकडून निर्णय आल्यानंतर संबंधित बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सह शहर अभियंता (स्थापत्य) मकरंद निकम यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.