Pune : एकतर्फी प्रेमातून फेक फेसबुक अकाउंट बनवून महिलेची बदनामी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

​एमपीसी न्यूज – फेक फेसबुक अकाउंट तयार करून एकाच कंपनीत काम करणा-या हडपसर येथील तरुणीची बदनामी केल्याचा प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नील जॉर्ज ( वय 42, रा. वानवडी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करून एका अज्ञात इसमाने फेसबुकवर 2013 पासून अनेक फेक अकाउंट तयार करून महिलेची बदनामी केली आहे, अशी तक्रार देण्यात आली होती.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नील जॉर्ज (वय 42, रा. वानवडी) याने हा प्रकार केल्याचे समोर आले.  पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने फिर्यादी महिलेच्या मेल आयडीचा अनधिकृतपणे वापर करून मेलवर असणाऱ्या फोटोंचा वापर करून महिलेचे फेक फेसबुक अकाउंट तयार केले
होते. फेसबुकच्या  फेक अकाउंटवर फोटो पोस्ट करून महिलेची बदनामी करत होता. त्याचबरोबर महिलेच्या मित्राच्या बायकोला फेक अकाउंटवरून मेसेज पाठवून त्यांच्यात गैरसमज निर्माण करत असल्याचे उघडकीस आले.

फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच कंपनीत कामास असून महिलेवर असणाऱ्या एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचे समोर आले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई
साठी हडपसर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.