Kamshet News : कामशेत येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘भाजपा’द्वारे दिव्यांग बांधवांना तिरंगा वाटप

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) – भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असताना यंदाचे अमृतमहोत्सव वर्ष देशभर साजरे होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा सुवर्णक्षण ऐतिहासिक करण्यासाठी कामशेत शहरात भाजपा युवा मोर्चा,विद्यार्थी आघाडी यांच्यावतीने बांधवांना घरी जाऊन तिरंगा ध्वज देण्यात आला.

मावळ तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट निहाय प्रत्येक गावोगावी ‘हर घर तिरंगा’ अभियान मोहीम राबवण्यात यावी यासाठी मावळ भाजपने पूर्व तयारी केलेली आहे, त्याचप्रमाणे कामशेतमधील भाजप आघाडीने दिव्यांग बांधवाना तिरंगा घरपोच देत या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कामशेत भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण शिंदे, उपाध्यक्ष रमेश बच्चे,कार्याध्यक्ष शंकर  पिंगळे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष सागर साळवे,नामदेव काटकर, शंकर बडदे, महीला कार्याध्यक्ष मीनाताई मावकर,अक्षय मोरे,सोनू शिंदे आदी उपस्थित होते.

‘हरघर तिरंगा’ अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा, असे आवाहन संतोष कुंभार यांनी

केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.