_MPC_DIR_MPU_III

Pune : अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या ताब्यात; दोन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – कात्रज येथील गुजरवाडी फाट्याजवळ एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन एक लॅपटॉप व 14 मोबाईल असा जवळपास दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज (दि.9) कात्रज पोलिसांनी केली

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी विनोद भंडलकर यांना गुजरवाडी फाट्याजवळ एक अल्पवयीन मुलगा पाठीला बॅग लावून त्यात असलेले चोरीचे मोबाईल व लॅपटॉप विकण्यासाठी आलेला
असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून गुजरवाडी फाट्याजवळ जाऊन पाहणी केली असता तिथे त्यांना एक अल्पवयीन मुलगा दिसला. पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन हटकले असता तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न
करू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली तेव्हा त्याने गेल्या एका वर्षांपासून कात्रज परिसरात चो-या केल्याचे कबूल केले. तसेच त्याच्याजवळील बॅग चेक केली असता त्यामध्ये त्यांना एक लॅपटॉप व एकूण 14 मोबाईल मिळाले.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकारचे गुन्हे दाखल असल्याची खात्री करून त्या मुलास ताब्यात घेतले तसेच त्याच्याकडून 1 लाख 89 हजारांचा मुदेदमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास कात्रज पोलीस करत आहेत

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.