Pune – नायर टोळीतील मोक्का अंतर्गत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – गेल्या दीड वर्षापासून बापू नायर टोळीतील मोक्का अंतर्गत फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून पिस्टल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.

नितेश श्रीनिवास बसवंत (वय 26, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे रेकॉर्डवरील टोळी प्रमुख बापू नायर आणि त्याच्या साथीदारांवर 2015 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. बापू नायर टोळीतील सक्रिय सदस्य नितेश श्रीनिवास बसवंत हा मागील दीड वर्षापासून या गुन्ह्यात फरार होता. तो सातत्याने राहण्याची ठिकाणे बदलून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत होता.

नितेश हा खडकी येथे येणार असल्याची माहिती खबऱ्या कडून युनिट तीन च्या पोलीस नाईक संदीप तळेकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा कारवाई करून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गावठी बनावटीचे पिस्टल, दोन, आठ मोबाईल व अकरा सिम कार्ड्स असा ऐवज हस्तगत केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.