Sangvi News : कपडे वाटप करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – कपडे वाटप करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका व्यक्तीने वृद्ध महिलेला तिच्या अंगावरील दागिने एका पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. महिलेने सर्व दागिने काढून ठेवले असता अज्ञात इसम ते दागिने घेऊन पसार झाला. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख 11 हजारांचा ऐवज घेऊन गेल्याची फिर्याद सांगवी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

पारुबाई म्हादू काळे (वय 70, रा. पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता फिर्यादी काळे यांच्या घरासमोर एक अज्ञात व्यक्ती कपडे वाटप करण्याच्या बहाण्याने आला. त्याने बोलता बोलता काळे यांना त्यांच्या अंगावरील दागिने एका पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार काळे यांनी 90 हजारांची सोन्याची कंठीमाळ, एक लाख 20 रुपयांची सोनीची पोत, एक हजार 800 रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 11 हजार 800 रुपयांचा ऐवज एका पिशवीत काढून ठेवला. काळे यांची नजर चुकवून अज्ञात इसमाने तिथून धूम ठोकत फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.