Bhosari : बेरोजगार तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – बेरोजगार तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 9) रात्री पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे घडली. 

राजेश्वर दिनकरराव पाटील (वय 20, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी. मूळ रा. उदगीर, जि. लातूर), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश्वर बेरोजगार होता. नोकरीच्या शोधात तो पुण्याला आला होता. सध्या तो त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर पाटील याच्यासोबत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे राहत होता. गुरुवारी रात्री त्याने संत तुकाराम नगरमधील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची चिठ्ठी सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, राजेश्वर याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचे सांगत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.