गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Kalapini News : कलापिनी महिला मंचच्या महिलांनी अनुभवला अविस्मरणीय सहल 

एमपीसी न्यूज – कलापिनी संस्था छोट्या मुलांना,युवा वर्गाला,जेष्ठांना वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांच्या कलागुणांना वाव देत असते त्याप्रमाणेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला मंचची स्थापना केली आहे.नुकतीच कलापिनी महिला मंचची उरुळीकांचनजवळील ‘नेचर नेस्ट’ येथे सहल जावून आली. निसर्गाच्या सानिध्यात सर्व महिलानी मनसोक्त आनंद लुटला.

सकाळी सात वाजता कलापिनीच्या प्रवेशद्वारात श्रीफळ वाढवून महिला मंच एक्सप्रेस उरळीकांचनच्या दिशेने सुसाट धावत सुटली. मग सुरू झाल्या गाडीत भेंड्या, अंताक्षरी, डान्स, गप्पा, हास्यविनोद इत्यादी. नेचर नेस्टमध्ये गाडीत शिरताच हिरव्यागार, शांत, प्रसन्न वातावरणात सर्व महिलांचे चेहेरे आनंदाने खुलले होते.सगळ्या महिलांचे एकत्रीतपणे संगीत खूर्ची, क्रिकेट एखादा क्लू देऊन मनातले ओळखणे, एकमेकांचे छान गुण सांगणे असे अनेक मनोरंजनात्मक आणि बौध्दीक खेळ घेतले.सर्व महिलांनी रेन डान्स, स्विमिंग आनंद मनापासून लुटला.

संध्याकाळी ट्रॅक्टरमधून डाळिंबाच्या बागेतून सफर छान सफर केली. भरपूर फोटो,व्हिडिओ ज्या मैत्रिणी आल्या नाहीत त्यांच्यासाठी आठवणीने काढले.उकडलेली कणसे आणि चहा यांचा आस्वाद घेवून, भरपूर एनर्जी भरुन घेवून सहलीचा आनंद घेवून,सर्व महिला आनंदाने घरी परतल्या आणि या वेळेस ज्या मैत्रिणींना सहलीला यायला जमले नाही. त्यांच्या सोईने नंतरची सहल पुन्हा जमवून नक्की ट्रीप काढू असे सर्वानुमते ठरले. कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुध्दे शालीत सहभागी होत्या.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या अडसूळे आणि लीना परगी यांनी सर्व नियोजन उत्तम केले होते.

Latest news
Related news