Pune : लिफ्टमध्ये अडकून पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – लिफ्टमध्ये अडकून पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार) सायंकाळी सहाच्या सुमारास मोमीनपुरा, झोहरा कॉम्प्लेक्स, बी विंग येथे घडली. 

सरहा खान (वय 5), असे या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरहा ही आज सायंकाळी सहाच्या सुमारास मोमीनपुरा, झोहरा कॉम्प्लेक्स, बी विंगच्या लिफ्टमध्ये अडकली. लिफ्टमध्ये अडकल्याने तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी तिथे धाव घेतली. ही लिफ्ट दोन मजल्यांच्यामध्येच अडकली होती. परंतू नागरिकांनी प्रयत्नकरून तिला बाहेर काढले. मात्र, ती अत्यंत जखमी झाली होती. तिला तात्काळ केईएम हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.