Swargate : पाटबंधारे जवळील कालव्यात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

एमपीसी न्यूज – स्वारगेट येथील पाटबंधारे विभागाजवळील कालव्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.

अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर सायंकाळी साडेचारच्या सुमारास बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून दोन दिवसांपासून मृतदेह पाण्यात असल्याचा अंदाज जवानांनी व्यक्त केला आहे.

या कारवाईत प्रदीप खेडेकर, सचिन जोंजळे, प्रताप फणसे, विजय टेंगळे या जवानांनी भाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.