Chakan : फॉर्च्युनर मधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम पळवले

एमपीसी न्यूज – फॉर्च्युनर कार मधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम कापून नेले. ही घटना आज, रविवारी (दि. 15) पहाटे दोनच्या सुमारास म्हाळुंगे येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण जवळ म्हाळुंगे येथे ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास फॉर्च्युनर कार मधून चोरटे आले. त्यांनी एटीएम कापून पळवून नेले. एटीएममध्ये रोकड किती होती, याबाबत अद्याप समजू शकले नाही. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
वारंवार घडणाऱ्या एटीएम पळविण्याच्या घटना पोलिसांच्यास कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. पोलीस आयुक्तांनी एटीएमच्या सुरक्षेबाबत विशेष गस्त घालण्याच्या सूचना दिल्या असून या गस्ती देखील नावापुरत्याच असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.