Chinchwad : चिंचवड येथे अज्ञातांनी दोन दुचाकी जाळल्या

एमपीसी न्यूज – चिंचवड मधील लिंक रोड पत्राशेड येथे अज्ञात इसमांनी दोन दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला. ही घटना मंगळवारी (दि. 12) पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे.

 याप्रकरणी  राहुल नारायण भोळे (वय 26, रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांनी मंगळवारी पहाटे त्यांची 80 हजार रुपये किमतीची  दुचाकी (एमएच 14 / एचएस 4022) घरासमोर पार्क केली होती. त्यांच्या दुचाकीच्या शेजारी आणखी एक 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / एचटी 9370) पार्क केली होती.

अज्ञात इसमांनी फिर्यादी आणि त्यांच्या दुचाकीच्या शेजारी लावलेली दुचाकी जाळून टाकली. यामध्ये दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.