Union Budget 2021: अर्थसंकल्पाचे भाजपकडून स्वागत; राष्ट्रवादीची टीका

एमपीसी न्यूज – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज (सोमवारी) सादर केला. त्याचे पिंपरी-चिंचवड शहर भाजपने स्वागत केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली.

महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले,अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, वाहतूक, महाराष्ट्र मेट्रो, कृषी क्षेत्र, रेल्वे, आरोग्य, पंतप्रधान आत्मनिर्भर योजना यासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यासह सर्वांनाच दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, कोरोनामुळे उद्भवलेल्या संकट आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश आर्थिक संकटात सापडला. उद्योग-धंदे बंद पडले. व्यावसाय कोलमडले. त्यात असंख्य सर्वसामान्य, नोकरदारवर्गाच्या नोक-या केल्या. लोक बेरोजगार झाले.

कोरोना संकटानंतर केंद्र सरकारकडून सादर होणा-या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पातून करदात्यांना आणि सर्वसामान्यांना काहीतरी दिलासा मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु, अर्थसंकल्प पाहता देशवासायींचा अपेक्षाभंग करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.