Union Budget 2021: देशाला नवी उभारी देणारा अर्थसंकल्प – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संसदेत सादर करण्यात आलेला आजचा अर्थसंकल्प देशाला नवी उभारी देणारा असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेश सचिव गोरखे म्हणाले, “जगातील सर्वच देश कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले असताना भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा निर्धार या अर्थसंकल्पात केलेला दिसून येत आहे.

मरगळलेल्या सर्वच क्षेत्रांना मदतीचा हात देत, बळ पंखांना दिले आहे. घे भरारी आकाक्षांची असा विश्वासच आज अर्थसंकल्पाने सर्व भारतीयांना दिला आहे.

या अर्थसंकल्पातील 7 नवीन मेगा टेक्स्टाईल पार्कची घोषणा ही रोजगार निर्मिती बरोबरच कृषी क्षेत्राला उभारी देणारी आहे. लघुउद्योगांना उभारी देताना डिमांड वाढवण्यासाठी अनेक उत्पादनावरील आयात शुल्क वाढवले आहे. तसेच स्टील व आलाँय यांची भाववाढ रोखण्यासाठी आयात शुल्क कमी करून लघु उद्योगाला दिलासा दिलेला आहे, असे अमित गोरखे यांनी सांगितले.

याचबरोबर उद्योगासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे वीज डिस्ट्रीब्यूशन कंपन्यांना स्पर्धा व्हावी, या उद्देशाने दोन पेक्षा अधिक वीज वितरण कंपन्या असतील अशी योजना केली. कंपनी कायद्यातील बदलाबरोबरच ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी विशेष योजना जाहीर केली. एकूणच कोविड महामारीचे सावट असताना एकशे तीस कोटी भारतीयांना उभारी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे गोरखे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.