Union Budget 2021 LIVE Updates : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर देणार

एमपीसी न्यूज : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर केला आहेत. अर्थसंकल्प ‘कधी नव्हे इतका चांगला’ असणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्या काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

  • अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे 
  • कोरोना पतिबंधक लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची घोषणा. आरोग्य क्षेत्राचे बजेट १३७ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे.
  • आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा. यासाठी ६४ हजार कोटींची तरतूद.
  • जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी ‘व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’ लवकरच लागू करणार. वाहने भंगारात काढणे ऐच्छिक असेल.
  • ११२ जिल्ह्यांमध्ये स्वच्छ योजना राहील. आरोग्य क्षेत्र, पायाभूत सुविधांमध्ये भरीव तरतूद करणार. ७ नवे टेक्स्टाईल्स पार्क उभे करणार
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर देणार.
  • निर्मला सीतारामन यांच्याकडून करोना काळातील मदतीची माहिती. आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत २७.१ लाख कोटी रुपयनची मदत दिली. हे सर्व पाच मिनी अर्थसंकल्पासारखे होते.
  • नागपूर फेज २ आणि  नाशिक फेज १ मेट्रोची घोषणा 
  • कचऱ्याची विल्लेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींची तरतूद 
  • २ आणि ३ श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाइनचा विस्तार करणार 
  • मुंबई कन्याकुमारी महामार्गसाठी ६४ हजार कोटी तरतूद 
  • देशात ७ मेगा  इनव्हेसमेंट पार्क उभारणार
  • जलजीवन योजनेसाठी २ लाख ८७ हजार कोटीची तरतूद 
  • आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटीच्या निधीची तरतूद 
  • १५ अत्यवश्यक आरोग्य केंद्र आणि २ मोबाईल हॉस्पिटलची सुविधा 
  • देशातील जनतेला स्वच्छ पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट
  • राष्ट्रीय आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधासाठी मोठी तरतूद
  • प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्याची घोषणा 
  • आजारांना आळा घालण्यासाठी विविध उपयोजनसाठी विविध तरतुदी 
  • ११२ जिल्ह्यत मिशन पोषणाची घोषणा 
  • देशातील शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विवीध योजना
  • आत्मनिर्भतर भारतासाठी जीडीपीच्या १३ टक्के पॅकेज 
  • कोरोनाशी सामना करताना सरकारने सगळे प्रयत्न केले 
  • कॅबिनेच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मिळाली मंजूरी. अर्थमंत्रीच्या  अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरवात

  •  मोदी कॅबिनेच्या बैठकीस सुरूवात झाली असून या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी मिळणार

  • अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसद भवनात दाखल.  अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरवात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.