union budget 2021 live updates : खासगी वाहनांची 20 वर्षानंतर तर व्यावसायिक वाहनांची 15 वर्षानंतर फिटनेस टेस्ट होणार

एमपीसी न्यूज :  आगामी काळात देशातील खासगी आणि व्यावसायिक वाहनांची फिटनेस टेस्ट होईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण  यांनी केली. या निर्णयानुसार खासगी वाहनांची 20 वर्षानंतर तर व्यावसायिक वाहनांची 15 वर्षानंतर फिटनेस सेंटरमध्ये तपासणी होईल. सरकारने ठरवून दिलेल्या फिटनेस सेंटरमध्ये ही तपासणी होईल, असे निर्मला सीतारामण यांनी जाहीर केले. मात्र, ही चाचणी ऐच्छिक असेल, असेही निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले. 

निर्मला सीतारामण यांनी सोमवारी 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

या निर्णयामुळे इंधनाची बचत, पर्यावरणाची हानी आणि प्रदूषण रोखले जाईल. तसेच इंधनाच्या आयातीवरील खर्चही कमी होईल, असे निर्मला सीतारामण यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.