Union budget 2021 live updates : सर्वसामान्यांना प्रतीक्षा असलेल्या कर संरचनेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत

एमपीसी न्यूज : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर केला आहेत. सर्वसामान्यांना प्रतीक्षा असलेल्या कर संरचनेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. टॅक्स स्लॅब जैसे थेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे करदात्यांची काहीशी निराशा झाली आहे.


  • २०२० मध्ये रेकॉर्डब्रेक ६ कोटी ४८ लाख लोकांनी आयकर रिटर्न भरल्याची अर्थमंत्र्यांची माहिती. जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी सहा ऐवजी तीन वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार.

  • सोने-चांदी होणार स्वस्त. सोन्या-चांदीवरील सीमा शुल्कामध्ये घट. १ ऑक्टोबरपासून नवीन सीमा शुल्क धोरण लागू होणार.

  • मोबाईल फोन महागणार. मोबाईलच्या काही उपकरणावरील सीमा शुल्क २.५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. तर तांबे आणि स्टीलच्या करात कपात करण्यात आली आहे.

  • टॅक्स ऑडिटची मर्यादा पाच कोटींवरुन १० कोटींवर. गुंतवणूक वाढवण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय.

  • अनिवासीय भारतीयांना कर भरण्यास मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी त्यांना डबल कर प्रणालीमधून सूट देण्यात येणार. स्टार्ट अप उद्योगांना करामधून देण्यात आलेली सूट ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्लॅबनुसार टॅक्स भरावे लागतील पण रिटर्न फाईल करण्याची गरज नाही. याचा लाभ केवळ पेन्शनधारकांसाठी असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.