Union Budget 2021 : पेट्रोलवर अडीच,डिझेलवर प्रति लीटर चार रुपये कृषी उपकर

एमपीसी न्यूज – पेट्रोलवर प्रति लीटर अडीच रुपये आणि डिझेलवर प्रति लीटर चार रुपये कृषी उपकर लागू करण्यात आला आहे. मात्र, उपकर लागू केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पेट्रोलवर अडीच रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर चार रुपये कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकर (एसआयडीसी) लावण्याचा प्रस्ताव आहे.

पेट्रोल आणि डिझेल महागलं तर इतर गोष्टींच्या किंमतीही वाढतात. कारण डिझेल महाग झाल्यामुळे ट्रक वाहतुकीचा खर्च वाढेल. पण ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही, असे सीतारमण यांनी म्हटलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर यापूर्वीच गगनाला भिडले आहेत. शहरात पेट्रोलचा दर 92.80रुपये प्रतिलिटर तर डिझेल 83.30 रुपये प्रति लिटरवर आहेत.

अर्थसंकल्पात पेट्रोलवर उपकर लागू करण्यात आला असला तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार नसल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.