Amit Shah Tests Positive : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

Union Home Minister Amit Shah tests positive for COVID-19, admitted to hospital कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर, माझी चाचणी घेण्यात आली आणि माझा चाचणी अहवाल सकारात्मक आला. माझी प्रकृती ठीक आहे.

एमपीसी न्यूज – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे.

‘कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर, माझी चाचणी घेण्यात आली आणि माझा चाचणी अहवाल सकारात्मक आला. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले आहे.

गेल्या काही दिवसांत माझ्याशी संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया स्वतःला वेगळं करावे आणि गरज पडल्यास चाचणी करून घ्यावी, असे आवाहन अमित शहा यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.