Maval News : केंद्रीय मंत्री कपिल पाटील एकविरा देवीच्या चरणी लीन

एमपीसी न्यूज – केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि ठाणे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रशांत पाटील, ठाणे जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांनी एकविरा देवीचे दर्शन घेतले. भाविकांना सदैव तारणारी, नवसाला पावणारी व सदैव कृपेची सावली होऊन पाठराखण करणारी आई एकवीरा म्हणजे माया, दया, क्षमा, शांती व समाधानाचे स्थान आहे. जलदेवता म्हणून एकवीरा देवी समस्त कोळी-आगरी सीकेपी सोनार अठरापगड जातीची कुलस्वामिनी आहे. मनोभावे पूजा करून एकविरा देवीच्या चरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील लीन झाले.

यावेळी ग्रामपंचायत वेहेरगाव, दहीवली,भाजप महिला मावळ तालुका आघाडी तसेच पुजारी व देवस्थानच्या वतीने देवीचा प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, वेहेरगाव उपसरपंच काजल पडवळ पोलीस पाटील अनिल पडवळ, भाजप तालुका महीला अध्यक्षा सायली बोत्रे, मोरेश्वर पडवळ, नवनाथ पडवळ, सदाशिव देशमुख, मंगेश देशमुख, सचिन देशमुख उपस्थित होते.

तसेच, काळूराम देशमुख, नवनाथ देशमुख, एकनाथ गायकवाड, निवृत्ती बोत्रे, संदीप देवकर, पप्पू देवकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड, शंकर बोरकर, वसंत माने, संजय देवकर, अशोक पडवळ, संतोष देवकर, एकवीरा देवस्थान व्यवस्थापक मंगेश गायकवाड, बाळु पडवळ व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.