Nirmala Sitharaman : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या फोटोला फासले काळे

एमपीसी न्यूज – पुण्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांचा तीन दिवसीय दौरा सुरु असताना त्यांच्या बॅनरवरील फोटोला काही अज्ञातांनी काळे फासल्याची घटना घडली.

धनकवडी भागात शिवछत्रपती सभागृह येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवरील फोटोला काळे फासले आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचा देखील या कमानीवर फोटो होता. नेमके हे काळे फासण्याचे कृत्य कोणी केले हे अद्याप ही कळू शकले नाही.

PCMC Breaking News : नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी तातडीने स्वीकारला पदभार

हा सर्व प्रकार काही अज्ञातांनी काल रात्री (Nirmala Sitharaman) केल्याचे सूत्रांनी सांगितले असून अद्याप अजून पोलिसात तक्रार करण्यात आलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.