Pune News : माझ्या आयुष्यात पेट्रोल – डिझेल बंद करायचे आहे – नितीन गडकरी

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस वाढत असलेले वायू, जल, साऊंड प्रदूषण चिंताजनक आहे. साखर ऐवजी इथेनॉलवर गाड्या चालल्या तर प्रदूषण होणार नाही, असे सांगून मला माझ्या आयुष्यात पेट्रोल – डिझेल बंद करायचे आहे, अशी रोखठोक भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मांडली.

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज (दि.24) आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, डॉ. नीलम गोऱ्हे, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, अनिल टिंगरे, पुणे महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते गणेश बीडकर, खासदार गिरीश बापट, अध्यक्षस्थानी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘मुंबई पेक्षा पुणे आता मोठे झाले आहे. 2018 – 19 चा अर्थसंकल्प मांडताना या पुलाचा विषय मांडला होता. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आता पुढाकार घेतला असून अडीच किलोमीटर 135 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जायका प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. घनकचरा, स्मार्ट सिटी यावर मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत आहे. साधारण 1 हजार कोटींचे कामे सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीएमएल विविध उपाययोजना करीत आहे. कोथरूड मेट्रो लवकरच सुरू होणार आहेत.  तर, समाविष्ट गावांत सुद्धा 24 बाय 7 योजना सुरू होणार आहे. याचबरोबर भारतरत्न अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालय लवकरच मार्गी लागणार आहे. चांदणी चौक उड्डाणपूल 850 कोटी लागणार आहेत.”

दरम्यान, माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘जवळपास 10 वर्षे झाले, या उड्डाणपुलासाठी प्रयत्न केले. केंद्र सरकारची वेगाने कामे सुरू आहेत. उड्डाणपुलाविषयी बोलताना भीमराव तापकीर म्हणाले, या उड्डाणपुलामुळे ग्रामीण भागाला जास्त फायदा होणार आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती.

गिरीश बापट म्हणाले, ‘रस्त्याचं जाळ विणण्यात नितीन गडकरी यांचा मोठा आहे. ज्यांनी ज्यांनी फ्लेक्स लावले, त्यांच्याकडून फ्लेक्स फंड घ्या, त्यामुळे पैसा काही कमी पडणार नाही.’ तर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘फ्लेक्स लावण्याचा खर्च खासदार बापट यांच्या खिशातून काढण्यात यावा, कारण सर्वाधिक फ्लेक्स आपलेच आहे.’ दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा विकासकामासंदर्भात बोलताना म्हणाले, ‘विकासकामासंदर्भात राज्य आणि केंद्र अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक लावा. मुख्यमंत्री, मी आणि गडकरी उपस्थित राहणार आहेत. एकरला 18 कोटी रुपये देणे शक्य नाही कारण मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत आहे.’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘गजबजलेल्या ठिकाणी उड्डाणपूल उभारला जातोय. पुण्यातील मेट्रो संदर्भात वरून करायची की खालून करायची यावर बरीच चर्चा झाली. आता मात्र मेट्रोचे काम वेगाने सुरू आहेत. पुणे विमानतळ 13 एकरसाठी जागा द्यायची होती, चंदीगडच्या धर्तीवर जागा मिळविली. नदी विकास प्रकल्प 1400 कोटी लागणार आहे असून जायकाचे टेंडरही निघाले. 3 मोठ मोठे प्रकल्प नागपूरमध्ये केले. 50 हजार कोटी प्रकल्प तळेगाव ते वाघोली दरम्यान करायचा आहे.’

दिल्लीला नरिमन पॉईंट जोडणार आहे. या भागाला माझे भावनिक नाते आहे. पैशाची काहीही अडचण येणार नाही. मी केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे पैसे मागायला जात नाही. पुणे ते बारामती, सोलापूर, कोल्हापूर, या भागात जाण्यासाठी 1 कोटी मेट्रो विचारात आहे. अशा 100 मेट्रो करायच्या आहेत. याला बँक लोन देणार आहेत, असे गडकरी यांनी बोलताना सांगितले.

तरुणांच्या रोजगाराविषयी बोलताना गडकरी म्हणाले, ‘बेरोजगार, तरुणांना या मेट्रोचा फायदा होणार आहे. त्यासाठी रेल्वेचा ड्रायव्हर असेल, बिन पैशाची मेट्रो होईल. आहे त्या किमतीत हा डबल डेकर उड्डाणपूल करणे शक्य असून रोड रिंग तयार करून उपयोग होणार आहे.’

दरम्यान, प्रदुषणाच्या वाढत्या संकटाची गडकरी यांनी चिंता व्यक्त करत काही उपाययोजना करता येईल का याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले. गडकरी म्हणाले, ‘वायू, जल, साउंड प्रदूषण वाढते आहे. ते आटोक्यात यावे. भारतीय संस्कृतीचे हॉर्न असावे. रिंग रोड साठी लँड अकवेशन ताब्यात घ्याव्यात. याबाबत पंतप्रधान यांनी 3 प्रकल्प पुण्यात सुरू केले. माझ्या आयुष्यात पेट्रोल डिझेल बंद करायचे आहे, याला पर्याय म्हणून इथेनॉल इंजिन तयार करायला सांगितले आहे. यांचे पंपही सुरू झाले आहेत. साखर ऐवजी इथेनॉल वर गाड्या चालल्या तर पोलुशन होणार नाही.

पुणे, सांगली, सातारा जिह्यात हे पंप सुरू करा, भारत सरकारची काय परवानगी लागेल ती देऊ, पुण्याचा चोहोबाजूंनी विकास होतोय. 12 हजार कोटी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीसाठी खर्च होणार आहे, याबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक लावा, असे आवाहन गडकरी यांनी उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि हेमंत रासने यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.