United Kingdom : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोना ‘पॉझिटिव्ह’

एमपीसी न्यूज – याअगोदर ब्रिटिश राजघराण्याचे वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आणि एकच खळबळ माजली होती. आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. बोरिस जॉन्सन यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली कोरोनासाठी केलेली चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.

बोरिस म्हणाले, गेल्या चोवीस तासात मला काही लक्षणे जाणवून आली. तपासणी केली असता माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये असून, व्हिडिओ कॉन्फेरंसन्गच्या माध्यमातून माझ्या सरकारचे नेतृत्व करणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1