University Exams : विद्यापीठ परीक्षांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचा ‘ग्रीन सिग्नल’

University Exams: Union Home Ministry's 'green signal' for university exams

एमपीसी न्यूज – केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पत्राद्वारे विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्यासाठी  ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. विद्यापीठांच्या परीक्षा यूजीसी मार्गदर्शक सूचनांनुसार आणि स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरअंतर्गत घेण्यात याव्या, अशाही सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. सीबीएसई, नीट, जेईई सारख्या परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यापीठांच्या परीक्षांही रद्द होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाबसह अनेक राज्यांनी आधीच परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र यूजीसीच्या गाईडलाईन्स राज्यांवर बंधनकारक असतीलच असं नाही. त्यामुळे राज्यात परीक्षा होणार की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने, आज केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पाठवलेल्या पत्रात, विद्यापिठे आणि शैक्षणिक संस्थाना, परीक्षा घ्यायला परवानगी दिली आहे. यूजीसीच्या परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रकाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंजूर केलेल्या मानक प्रचालन प्रक्रियेनुसार (एसओपी) नुसार विद्यापीठांसाठी अंतिम सत्र परीक्षा घेणे अनिवार्य आहे, असे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.