_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : ‘एनएसयुआय’कडून परीक्षेबाबतचे परिपत्रक जाळून विद्यापीठ अनुदान आयोगाचा निषेध

University Grants Commission protests by burning NSUI circulars on exams : विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन परीक्षा तात्काळ रद्द कराव्यात,

एमपीसी न्यूज – तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला निर्णय चुकीचा असल्याच्या निषेधार्थ ‘एनएसयुआय’च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुण्यात आयोगाचे परिपत्रक जाळून निषेध नोंदवला.

देशामध्ये कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असल्यामुळे अनेक राज्य सरकारने तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्य व जीविताचा विचार न करता विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा काही मार्गदर्शकतत्वांचे पालन करून घेण्यात याव्यात, असे परिपत्रक काढले.

सध्याची भयानक सद्यस्थिती पाहता परीक्षा शक्य नाही. तसेच विद्यार्थ्यांची मानसिक तयारी, राहण्यासाठी जागा, जेवणाची व्यवस्था, प्रवास अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे एनएसयुआयच्या वतीने विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकारच्या परिपत्राच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

संघटनेचे राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र राज्य प्रभारी अमितसिंग टिमा, एनएसयुआयचे महाराष्ट्र अध्यक्ष अमिर शेख यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व जिल्हा, तालुका, शहर युनिटने शासनाला या संदर्भात निवेदन दिले व परिपत्रक जाळून निषेध व्यक्त केला.

सोशल मीडियाद्वारे परीक्षेसंदर्भात आपल्या भावना विद्यार्थी व पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षेसंदर्भात घेतलेला निर्णय अयोग्य आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या आरोग्य व जिवताशी खेळल्यासारखे आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकार यांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन परीक्षा तात्काळ रद्द कराव्यात,; अन्यथा देश पातळीवरुन व्यापक अंदोलन उभारले जाईल, असा इशारा प्रदेश अध्यक्ष अमिर शेख यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.