University Rankings : जागतिक QS मानांकनात दोनशेमध्ये भारतातील तीन विद्यापीठांचा समावेश

संशोधनाबाबत बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था जगात सर्वोत्कृष्ट

0

एमपीसी न्यूज – क्वाकारेली सायमंड्स (QS) ही संस्था जागतिक पातळीवर उच्चशिक्षण संस्थांचे विश्लेषण करते. जगभरातील शैक्षणिक संस्थांसाठी अठरावी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मानांकने आज या संस्थेने जाहीर केली. विद्यापीठांसाठीच्या QS या जागतिक मानांकनात 2022 मध्ये, भारतातील 3 विद्यापीठांनी पहिल्या दोनशेमध्ये स्थान मिळवले आहे. तर, संशोधनाबाबत बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था जगात सर्वोत्कृष्ट ठरली आहे.

विद्यापीठ मानांकनांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था-मुंबई (IIT-B) 177 व्या, दिल्ली-आयआयटी 185 व्या तर बेंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था 186 व्या क्रमांकावर आहे.

_MPC_DIR_MPU_II

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या संस्थांचे अभिनंदन केले आहे. शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रांत भारत उत्तुंग भरारी घेत असून, तो आता जगद्गुरू होण्याच्या मार्गावर आहे, अशा शब्दात पोखरियाल यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थी, अध्यापकवर्ग आणि शिक्षणक्षेत्राशी संबंधित अन्य भागीदारांचे सतत कल्याण चिंतणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा गुरु लाभल्याचा अभिमान वाटतो अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या शिक्षणसंस्थांना जागतिक क्रमवारीत स्थान मिळण्यात, राष्ट्रीय शिक्षण धोरण– 2020 आणि सर्वोत्तमता संस्थेसारख्या उपक्रमांचे योगदान मोठे आहे. QS आणि टाइम्स समूहाने घोषित केलेल्या मानांकनांवरून असाच निष्कर्ष निघत असल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment