Pune :कंटेनरच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंटेनरची जोरदार धडक बसून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.6) रात्री 10 च्या दरम्यान कात्रज बायपास हायवेवर बाबाच्या पेट्रोलपंपाजवळ घडली.याप्रकरणी अहमदखान पठाण यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील कंटेनरने कात्रज बायपास हायवेवरील बाबाच्या पेट्रोलपंपाजवळ एका 45 वर्षीय व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीररित्या जखमी होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघातानंतर कंटेनरचालक कंटेनरसहित फरार झाला.

याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.