Sexual Abuse of Child: केस कापण्यासाठी सलून मध्ये गेलेल्या 7 वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, कामगार अटकेत

एमपीसी न्यूज: केस कापण्यासाठी एका सलूनच्या दुकानात गेलेल्या सात वर्षे मुलासोबत दुकानातीलच कामगाराने अनैसर्गिक कृत्य (Sexual Abuse of Child) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलाची आई त्याला केस कापण्यासाठी दुकानात सोडून गेली होती. त्यानंतर दुकानातील कामगारांनी हे घृणास्पद कृत्य केलं.पोलिसांनी कामगाराला अटक केली आहे.

सज्जन सहेआलम सलमानी (वय 20, रा. संतनगर, लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलाच्या वडीलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 7) पिडीत मुलाची आई त्यांच्या 7 वर्षाच्या मुलाला केस कापण्यासाठी सलूनमध्ये सोडून गेली होती. सलूनमध्ये वेळ लागणार असल्याने संबंधित महिला घरी गेली. याचा फायदा घेत संबंधीत कामागाने या चिमुकल्या मुलाला आतील खोलीत नेले. त्याठिकाणी अश्लिल चाळे करून अनैसर्गिक कृत्य केले. तर ही गोष्ट कोणालाही सांगितल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देखील या कामगाराने दिली. संशयीत आरोपीने यावेळी मुलाचे केस कापून घरी पाठवून दिले. परंतु मुलाने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.