Pune News : अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : पंधरा वर्षीय मुलाला नाश्ता करण्याच्या बहाण्याने घेऊन जात त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या एका 32 वर्षे तरुणाला अटक करण्यात आली आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात. रवींद्र उर्फ बल्ली कांबळे (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडीत मुलाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीने पीडित मुलाला नाश्ता करण्याच्या बहाण्याने स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका स्मशानभूमी जवळील पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने या मुलाला घृणास्पद कृत्य करण्यास सांगितले. पुराने त्याला विरोध केला असता गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली तसेच स्मशानभूमीत पुरून टाकण्याची धमकी दिली आणि त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.

स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.