Maval News : मावळ माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी अशोक धनोकार, सचिवपदी संतोष भोसले यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – मावळ माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी अशोक शामराव धनोकार, सचिवपदी संतोष प्रल्हाद भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळ तालुका माध्यमिक शिक्षक संघ, मावळ तालुका शिक्षक लोकशाही आघाडी संघ व महिला आघाडी यांची वार्षिक सभा रविवारी (दि. 23) रमेश कुमार सहानी विद्यालय, वडगाव मावळ  येथे पार पडली. यावेळी ही निवड करण्यात आली. लक्ष्मीकांत मारूती मुंडे आणि सुरेश हनुमंत सुतार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य  लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुळशी तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील सातव यांच्या उपस्थितीत वार्षिक सभा पार पडली. निवडणूक निरिक्षक म्हणून प्राचार्य हनुमंत चव्हाण व धर्मराज साळवे यांनी काम पाहिले. तसेच पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा स्नेहल दत्तात्रय बाळसराफ, पुणे शहर लोकशाही शिक्षक संघाचे सचिव संतोष थोरात हेही उपस्थित होते.

मावळ माध्यमिक शिक्षक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक शामराव धनोकार यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली. यावेळी मावळ माध्यमिक शिक्षक संघाची आणि शिक्षक लोकशाही आघाडी तसेच महिला आघाडी संघाची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. मावळ तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी अशोक धनोकार  यांची तर सचिवपदी संतोष भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच लक्ष्मीकांत  मारूती मुंडे आणि सुरेश हनुमंत सुतार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मावळ तालुका लोकशाही आघाडी शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण  येणारे तर सचिवपदी प्रविणकुमार हुलावळे यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी आदिनाथ आगळमे आणि उपाध्यक्षपदी विशाल मोरे व गुलाब मुरलीधर शिंदे यांची निवड करण्यात आली.

तसेच महिला तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी वर्षा हनुमंत बारबोले तर सचिवपदी श्रद्धा भुपेंद्र टिळेकर यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षा आशावरी मुंगीकर  आणि अलका हरिभाऊ आडकर यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा शिक्षक प्रतिनिधी म्हणून खुने मनोहर राजाराम व चंद्रकांत कल्याणी कांबळे आणि  मावळ तालुका माध्यमिक शिक्षक लोकशाही आघाडीच्या  जिल्हा प्रतिनिधीपदी संदिप गाडेकर आणि  दिनेश शिवाजीराव टाकवे यांची निवड करण्यात आली.तसेच महिला प्रतिनिधी म्हणून रूक्मिणी पांडुरंग काळे व अंकिता आशिष बुटाला यांची निवड करण्यात आली.

महा सभेचे प्रास्ताविक पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा स्नेहल बाळसराफ यांनी केले तसेच उपस्थितांचे स्वागत मावळ तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक धनोकार यांनी केले. तर लोकशाही शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष विशाल मोरे  यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.