_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Wakad News : रस्त्यावर थांबलेल्या व्यवसायिकास विनाकारण बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – रस्त्यावर थांबून मोबाईल फोन पाहत असलेल्या एका व्यावसायिकाला दोघांनी विनाकारण शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. यामध्ये व्यवसायिक जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 9) रात्री व्हर्व सोसायटी समोर वाकड येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

सतीश रामहरी सोनवणे (वय 40, रा. गणेशनगर, थेरगाव) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत गुरुवारी (दि. 10) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पद्माकर वाव्हळकर (वय 38), किरण पेंटर (वय 39) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी व्हर्व सोसायटी समोर वाकड येथे सार्वजनिक रस्त्यावर त्यांच्या दुचाकीवर (एम एच 20 / सी जी 5186) बसून मोबाईल फोन हाताळत होते. त्यावेळी दोन्ही आरोपी फिर्यादी यांच्याजवळ आले.

त्यांना काही एक न विचारता लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपींसून फिर्यादी यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादी यांच्या डोक्‍यात आणि हातावर मारून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment