Pune : वर्नोन गोन्साल्वीस आणि अरूण फरेरा यांना मुंबईतून अटक

माआेवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन नजरकैदेत असलेल्या तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी मुंबईत कारवाई करत वर्नोन गोन्साल्वीस आणि अरूण फरेरा यांना अटक केली आहे. मात्र, अटक टाळण्यासाठी या तिघांनी ७ दिवसांची नजरकैद वाढविण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

माआेवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन नजरकैदेत असलेल्या तिघांचा जामीन अर्ज आज पुणे  सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सुधा भारद्वाज, वर्णन गोन्सालवीस आणि अरुण फरेरा या तिघांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आज जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आता तिघांना अटक करण्याचा मार्ग पुणे पोलिसांना मोकळा झाला आहे.

अटक टाळण्यासाठी या तिघांनी 7 दिवसांची नजरकैद वाढविण्यासाठी पुणे न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपीचे वकील हायकोर्टात जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.