PMPML bus fire : पीएमपीएमएलच्या बसमध्ये आग

एमपीसी न्यूज :  अप्पर डेपो बसस्थानक येथे पीएमपीएमएलच्या बसला आज दुपारी 12.04 मि. आग लागली. आगीची वर्दी प्राप्त होताच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून (PMPML bus fire) अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.यावेळी बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी बसच्या पुढील बाजूस इंजिनच्या ठिकाणी पेट घेतल्याचे निदर्शनास येताच आगीवर पाण्याचा मारा करुन आग पुर्ण विझवली. सदर बस ही अप्पर डेपो ते स्वारगेट या मार्गाची असून बसचालक विश्वास किलजे यांनी प्राथमिक स्तरावर प्रसंगावधान दाखवत तिथे बसस्थानकावर उपलब्ध असलेले दोन अग्निरोधक उपकरण वापरुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. बसमधे कोणीही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

PCMC News : विविध मागण्यांसाठी आपचा महापालिकेवर आक्रोश मोर्चा

या कामगिरीत गंगाधाम अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी सुनिल नाईकनवरे, वाहनचालक निलेश कदम व जवान जितेंद्र कुंभार, आदिनाथ मोहिते यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.